श्रीपाद धर्माधिकारी - लेख सूची

शेतीच्या पाण्याचा व्यापार

[ पाण्याचा बाजार किंवा व्यापार म्हटले की समोर येते ते बाजारात सर्वत्र दिसणारे बाटलीबंद पाणी. पण आता पाण्याच्या व्यापाराचे नवीन – आणि सरकार – पुरस्कृत स्वरूप महाराष्ट्रात पुढे येत आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने (मजनिप्रा) शेतीच्या आणि शेतकऱ्याच्या पाण्याचा व्यापार उभा करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. एकीकडे राज्यातील सिंचन विभागात भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराने गदारोळ माजविला …

विकासनीतीची प्रतीकचिह्न (भाग-३)

आजच्या विकासाच्या प्रतीकचिह्नांना विकासाचे लक्षण न मानता त्यांच्यामागचे सत्य तपासून पाहणे का गरजेचे आहे हे आपण मागच्या दोन लेखांत पाहिले. प्रतीकचिह्नांच्या मागचे सत्य शोधणे म्हणजेच आजच्या विकासाच्या मानचिह्नांबद्दल मूलभूत प्रश्न उभे करणे. असे करण्यामागील एक महत्त्वाचे कारण, या विकासासाठी आवश्यक असलेली साधने आपल्याला पुरेशा प्रमाणात उपलब्ध असणार आहेत का, त्या साधनांचा उपयोग आपल्याला प्रमाणाबाहेर करावा …

विकासनीतीची प्रतीकचिह्न (भाग-२)

1966 मध्ये भारतात हरितक्रांतीची सुरुवात झाली. ही सुरुवात तशी दणकेबाज होती. 1965-66 मध्ये भारतात अन्नधान्याचे एकूण उत्पादन 72.35 दशलक्ष टन होते. त्यानंतर फक्त 5 वर्षांत, म्हणजे 1970-71 मध्ये या उत्पादनाने 108.42 दशलक्ष टनाचा उच्चांक गाठला. ही घटना इतकी क्रांतिकारी होती की त्यातून कुठे तरी हरितक्रांती या शब्दाची निर्मिती झाली असावी. खरे तर या क्रांतीच्या मुळात …

विकासनीतीची प्रतीकचिह्न (भाग-१)

विचारायला हवेत असे काही प्रश्न संसदेला उद्देशून 20 एप्रिल 2005 ला केशूभाई पटेल-गुजरातचे माजी मख्यमंत्री म्हणाले होते, “आपल्याकडे जर भाक्रा नांगल नसते तर आज आपण रेशनच्या रांगेत उभे असतो.” असे म्हटले जात असताना देखील प्रत्यक्षात लाखो लोक भूक आणि कुपोषण ह्यांना सामोरे जात असलेले आपल्याकडे होते. यातील उपरोधाचा भाग बाजूला ठेवला तरीही या विधानावरून भाक्रा …